माधुरीची दिवसाची कमाई एक कोटी

बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित ‘कौन बनेगा करोडपती’ या शो मध्ये सहभागी झालेली नसताना देखील दिवसाला एक कोटी रुपये कमवत आहे. गेल्या काही दिवसापासून कलर्स चॅनेलवर प्रसारित होत असलेल्या ‘झलक दिखला जा’ या शोचे होस्ट करण्यासाठी दिवसाला ती एक कोटी रुपये मानधन घेत आहे. हा शो सुरु होऊन तीन महिने झाले असून आठवड्यातून दोन वेळा या शोचे प्रसारण होते. त्यामुळे माधूरीने आतापर्यंत या शोच्या माध्यामातून किती तरी रुपये कमविले असतील.

माधुरीने लग्नानंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते मात्र ती यशस्वी झाली नव्हती. बी टाउनमधील स्टार मंडळीच्या ए लिस्ट मध्ये तिचे नाव आहे. त्यामुळेच ती या शोच्या माध्यमातून लोकप्रिय ठरली आहे. फिल्म मेकर करण जोहर आणि कोरिओग्राफर रेमो डीसुझा या शोमध्ये तिच्या सोबत जज म्हणून काम पाहतात. या शोचा चौथ्या भागासाठी माधुरीला जज म्हणून तिची निवड करण्यात आले आहे.

तिच्या शिवाय अमीर खानने ‘सत्यमेव जयते’साठी प्रत्येक शोला तीन कोटी, सलमानने ‘बिग बॉस’साठी प्रत्येक शोला तीन कोटी २५ लाख, शाहरुख खानने ‘जोर का झटका’साठी प्रत्येक शोला दोन कोटी, अक्षय कुमारने ‘खतरो के खिलाडी’साठी प्रत्येक शोला दोन कोटी, संजय दत्तने ‘बिग बॉस’साठी एक कोटी तर बिग बी अमिताभ बच्चनने ‘कौन बनेगा करोडपती’च्या तीन सिझनसाठी १०० कोटी घेतले आहेत.

Leave a Comment