नवी दिल्ली दि.६ – भारतीय वायूदलाच्या दोन पायलटना चीनच्या संरक्षण मंत्र्यांकडून मिळालेल्या अनपेक्षित गिफ्टची चर्चा सुरू झाली आहे. चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी या दोघांना बंद पाकिटातून चक्क १ लाख रू.रोख बक्षीस म्हणून दिले आहेत.

याविषयीची सविस्तर हकीकत अशी की चीनचे संरक्षणमंत्री गेन लियांग गुंग पाच दिवसांपूर्वी भारतभेटीवर आले होते. तेव्हा त्यांना सोमवारी मुंबईहून दिल्लीला नेण्यासाठी भारतीय वायुसेनेचे विशेष विमान देण्यात आले होते. बुधवारी लियांग परत निघाले तेव्हा त्यांनी या विमानाच्या दोन पायलटना बंद पाकिटे दिली. आश्चर्यचकीत झालेल्या या पायलटनी ती पाकिटे लियांग रवाना झाल्यानंतर उघडली तेव्हा त्यात १ लाख रूपये रोख असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी त्वरीत ही बाब वायुसेना मुख्यालयाकडे कळविली. नंतर ही रक्कम लियांग यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना परत न करता सरकारी कोशागारात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आपले मंत्रीही जेव्हा परदेशात जातात तेव्हा विमानातील क्रूला देण्यासाठी टाय, छोटे मोमेंटो अशा भेटी दिल्या जातात. मात्र रोख रककम देण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. लियांग रविवारी भारतभेटीवर आले होते. त्यांना देशांतर्गत भेटींसाठी वायूदलाचे विमान देण्यात आले होते. त्याबाबत त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री अँटनी यांचेही आभार मानले आणि त्यांची व्यवस्था उत्तम ठेवल्याबद्दल कौतुकही केले असेही समजते.