टीम इंडीयाचा कोच होण्याची गांगुलीची इच्छा

चार वर्षापूर्वीच अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडीयाचा कोच होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. एके काळी भारतीय संघासाठी विदेशी कोचची मागणी करणाऱ्या दादाने भविष्य काळात टीम इंडियाचा कोच म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

एका न्युज चॅनेलला नुकतीच त्याने मुलाखत दिली. यावेळी सौरव गांगुली म्हणाला, ‘ मला टीम इंडियाचा कोच व्हायला आवडेल. पूर्वीपासूनच मला कोच होण्याची आवड आहे. बीसीसीआयला जर वाटत असेल तर मी भविष्यात कोच होऊ शकतो. त्यासाठीची सर्व तयारी मी पूर्ण केली आहे. खेळाडूची क्षमता, फॉर्म आणि बदल घडून आणण्याची इच्छा असेल तर सर्व काही मनासारखे घडते. त्यामुळे मला संघाच्या प्रगतीसाठी कोच व्हायचे आहे. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी सध्या तरी कोच म्हणून डंकन फ्लेचरचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे या स्पर्धेनंतरच माझ्या नावावर विचार होऊ शकतो.’

भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून गांगुलीचे नाव घेतले जाते. कर्णधारला सपोर्ट करण्याचे काम नेहमीच कोचला करावे लागते. आता परत गांगुली कोचच्या भूमिकेतून कर्णधाराला बॅक सपोर्ट करण्यची जरी गांगुलीची इच्छा असली तरी बीसीसीआय याकडे कितपत लक्ष देणार यावर बरेचसे काही अवलंबून आहे.

Leave a Comment