माहिती तंत्रज्ञानाबाबत स्वायत्त प्रशिक्षण संस्था स्थापणार: टोपे

मुंबई: माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर वाढणारे सायबर गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी प्रशिक्षण देणारी स्वायत्त संस्था स्थापन करणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केली.

माहिती तंत्रज्ञान, माहितीची सुरक्षा, सायबर कायदा याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एस. सपकाळ यांच्या समितीने आपला अहवाल सादर केला. त्यावेळी टोपे बोलत होते.

सध्याच्या काळात उद्भविणार्‍या सायबर वॉरचा विचार करता इराण, नायजेरिया, चीन, रशिया या देशांप्रमाणे सायबर सेना उभारणीसाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून स्वायत्त संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने अहवाल सादर करावा; अशी सूचना टोपे यांनी समितीच्या सदस्यांना केली. या संस्थेचा अभ्यासक्रम जागतिक दर्जाचा आणि भविष्याचा वेध घेणारा असावा. त्याचप्रमाणे दूरशिक्षण पद्धतीचा कसा वापर करता येईल ते पाहावे; असेही टोपे यांनी सांगितले.

Leave a Comment