काही दिवसापासून इंडस्ट्रीजमध्ये विश्व सुंदरी ऐश्वर्या रॉय फक्त तिचा पती अभिषेक बच्चन सोबतच सिनेमातून काम करणार आहे यावरून गरमा गरम चर्चा रंगली होती. ही ऐश्वर्याची बाबतीतील बातमी वाचून फिल्म मेकर्ससह तिचे फॅन सुद्धा सरप्राइजड झाले होते. तिच्या या निर्णयामुळे सर्वचजण काहीसे बुचकळ्यात पडले होते.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ही एक कुणीतरी अफवा पसरविली होती. नुकतेच ऐश्वर्याच्या स्पोक्सपर्सनने आगामी काळात ती इंडस्ट्रीजमधील सर्वच टॉपच्या स्टार मंडळी सोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुळातच ऐश्वर्या ही एक प्रोपेश्नल पर्सनालिटी आहे. ती पर्सनल गोष्टी स्वतच्या करीयरच्यामध्ये आणून त्याचा सिनेमावर एफेक्ट होऊ देईल असे वाटत नाही. कोणी तरी तिला टार्गेट करून अशा स्वरूपाची मुद्दामहून अफवा पसरवली होती.
यापूर्वी ही ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत लग्न केल्यानंतर काही दिवसातच ती पतीशिवाय इतरा सोबत काम करणार नसल्याची अफवा पसरविण्यात आली होती. त्यानंतर ही ऐश्वर्याने स्मार्टपणा दाखवीत सर्वच टॉपच्या स्टार मंडळी सोबत काम करून टीकाकारांची तोंडे बंद केली होती.