कर्णधार धोनी पिचवर नाराज

न्यूझीलंड सोबतच्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या दोन्ही सामन्यात विजय मिळवला असला तरी या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या पिचबाबत कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

कर्णधार धोनी म्हणाला, ‘ या सामन्यासाठी क्युरेटरने तयार केलले मैदान हे अपेक्षेप्रमाणे तयार करण्यात आले नव्हते. आम्हला स्पिन गोलंदाजीला मदत करणाऱ्या मैदानावर खेळायला नेहमीच आवडते. मात्र हे मैदान स्पिनला मदत करत नसल्याने आम्हाला बेंगलोर येथील कसोटी सामन्यात विजयासाठी झुंजावे लागले.’ या धोनीच्या मताचे माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर याने समर्थन केले आहे. धोनीची मैदानाबाबत असलेली अपेक्षा योग्य असल्याचे प्रभाकरने म्हटले आहे.

या मैदानाबाबत प्रतिक्रिया देताना क्युरेटरने मात्र वेगळी प्रतिक्रीया दिली आहे. धोनीला हवे आहे तसे पीच आम्ही तयार करू शकत नाही. फिरकी गोलंदाजाना साथ देणारे पीच तयार केले तर त्याबाबत आयसीसीकडून विचारणा होऊ शकते. त्यामुळे असे करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment