साईना नेहवालही होतेय पुणेकर

पुणे दि.५ – क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर पाठोपाठ बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक मेडल मिळविलेली भारताची एकमेव व पहिली खेळाडू साईना नेहवाल हीही आता पुणेकर होत आहे. पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांनी साईनाला हिंजेवाडी येथे १२०० चौ.फुटांचे घर देऊ केले आहे.

सचिन येथील अमित बिल्डर्सचा ब्रँड अंबॅसिडर असून त्याला अमित बिल्डर्सनी आंबेगांव येथे बंगला दिला आहे. आता माझी वेळ आहे असे सांगून अविनाश भोसले म्हणाले की मी गेली तीस वर्षे नियमाने बॅडमिंटन खेळतो आहे. या खेळावर माझे प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच ही छोटीशी भेट मी साईनाने गाजविलेल्या कतृत्त्वाबद्दल आणि पराक्रमाबद्दल तिला देत आहे. विशेष म्हणजे मी जसा पुण्याचा आहे तसाच बॅडमिंटन या खेळाची सुरवात प्रथम पुण्यातच झाली आहे. पेशवे काळात हा खेळ येथे प्रथम खेळला गेला होता.

साईनाने पहिले वहिले ऑलिंपिक पदक या खेळासाठी भारताला मिळवून दिले आहे. या निमित्ताने तिचा सत्कार सोहळा वेस्टर्न इंडिया इरेक्टर्सतर्फे ७ सप्टेंबरला सायंकाळी होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी ती पुण्यात येत आहे तेव्हाच हिंजेवाडीतील घराच्या किल्ल्या तिच्याकडे सपूर्द केल्या जाणार आहेत. या घराची किमत ५० लाख रूपये आहे.

Leave a Comment