भारत वनडेमध्ये दुसऱ्या स्थानावर

इंग्लंडने चौथ्या वनडे मध्ये दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केल्याचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. यामुळे भारतीय संघ वनडेच्या जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर इंग्लंडने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान पुन्हा मिळवले होते. त्यावेळी भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता.

चौथ्या वनडे मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे तीन गुण कमी झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ११७ गुनासह तिसऱ्या स्थनावर पोहचला आहे. सध्या भारताच्या खात्यात १२० गुण असल्याने दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर इंग्लंड संघ १२३ गुनासह पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकाविले आहे.

नुकत्याच सुरु असलेल्या या मालिके दरम्यान दोन सामन्यापूर्वीच हे स्थान इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेने हिसकावून घेतले होते. ते पुन्हा काबीज करण्यात इंग्लंड संघाला यश आले आहे.