विद्यासाठी डॉक्टरला बोलवावे लागले सेटवर

काही दिवसापासून विद्या बालनची तब्येत सेटवर वारंवार बिघडत आहे. नुकतेच ‘घनचक्कर’ सिनामाचे शूट चालू असताना अचानक विद्या बालनाची तब्येत बिघडल्याने सेटवर डॉक्टरला बोलवावे लागले. हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी तिने डॉक्टरलाच सेटवर बोलावून तपसणी करून घेतली. त्यामुळे वेळतर वाचलाच शिवाय शुटचे काम ही व्यवस्थितरित्या पार पडले.

गेल्या काही दिवसापासून दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या ‘घनचक्कर’ या सिनेमाचे शूट सुरु आहे. सेटवर शुटचे काम सुरु असताना अचानक विद्याची तब्येत बिघडली. त्यामुळे विद्याने स्वता हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी त्याच ठिकाणी डॉक्टरला बोलावून घेतले. त्यामुळे वेळेची बचत झाली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी एकदा विद्या ‘डर्टी’ या सिनेमाची शूट करत असताना आजारी पडली होती. त्यावेळी तिला बांद्रा येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी ती मुंबईमधील एका स्टुडीओमध्ये शूट सुरु असताना आजारी पडली. या वेळी मात्र डॉक्टरानी सेटवरच तिच्या तब्येतेची काळजी घेतली. त्यामुळे तिला यावेळी अॅडमिट करावे लागले नाही.