अभिनेता रणवीर सिंग याने जगभरात कमाईचे एकामागून एक विक्रम करत असलेला ’एक था टायगर’ हा चित्रपट अतिशय कंटाळवाणा असल्याचे म्हटले आहे.

अभिनेता रणवीर सिंग याने जगभरात कमाईचे एकामागून एक विक्रम करत असलेला ’एक था टायगर’ हा चित्रपट अतिशय कंटाळवाणा असल्याचे म्हटले आहे.
रणवीर सिंगने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये फक्त दोन चित्रपटांत काम केले आहे. त्याला बॉलिवूडमधील घडामोडींसंबंधी जास्त माहिती नसतानाही त्याने असे वादग्रस्त विधान केले आहे. रणवीर सिंग आगामी ’लुटेरा’ चित्रपटात काम करत असून, तो चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ’एक था टायगर’विषयी रणवीरने असे वक्तव्य केल्याने या दोघांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
रणवीरने आपल्या ब्लॉगवर ’एक था टायगर’विषयी लिहिले आहे, की मला हा चित्रपट फक्त शेवटची १५ मिनिटे आवडला. कारण, त्यामध्ये चांगली ऍक्शन दाखविली आहे. बाकी सर्व चित्रपट अतिशय कंटाळवाणा आहे.