जोक ऑफ द इयर – जोकर’

या चित्रपटाचे शीर्षक ’जोकर’ असे का ठेवले हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतो. कदाचित निर्माता-दिग्दर्शक शिरीष कुंदर ने स्वतःच्या हुशारीवरुन हे शीर्षक ठेवले असावे. हा चित्रपट पागलपूर गावाभोवती फिरतो. हे गाव कोणत्याही राज्याला जोडलेले नाहीये.

स्वातंत्र्याच्या वेळी या गावाचा समावेश भारताच्या नकाशात करण्याचे टाळले गेले. मात्र तरीदेखील हे गाव आत्मनिर्भर आहे. गावात धरणाचे पाणी अडवून ते शेतीसाठी वापरले जाते. गावात वीज आहे. सहाशे लोकसंख्या असलेले हे गाव व्यवस्थितरित्या वसलेले गाव आहे. गावातील लोक चांगली हिंदी भाषा बोलतात. गावातील एक व्यक्ती (श्रेयस तळपदे) आपली भाषा अधिक चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. तर एक म्हातारी व्यक्ती आजही १९४० च्या काळातच जगतेय. तर एक जण ’करलो दुनिया मुठी में’ या वाक्यावर विश्वास ठेवतो. या गावावर इतर राज्याचा प्रभाव असल्याचे स्पष्ट जाणवते.

अक्षय कुमारसुद्धा या गावातील पुरुषांपैकीच एक आहे. या गावातच त्याचा जन्म झाला आहे. मात्र त्याने या जंगलातून पाय काढून अमेरिकेत पाऊल ठेवले आहे. तो तिथे चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे. या गावात इतर गावात असणारी पाणी किंवा वीज सारखी समस्या नाहीये. मात्र या गावाकडे राजकीय लोकांचे लक्ष आकर्षित केले जावे, अशी येथील गावकर्‍यांची इच्छा आहे.

अक्षय कुमार अगस्त्य नावाच्या शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. त्याने दुसर्‍या ग्रहावरील एलिअन्सबरोबर संपर्क साधणारी जगातील पहिली मशीन तयार केली आहे. त्याला या कामासाठी एक महिन्याचा जास्त कालावधी मिळाला आहे. सोनाक्षी सिन्हा (या चित्रपटात केवळ एका गाण्यात नाही तर मोठ्या भूमिकेत आहे.) नायकाची म्हणजेच अगस्त्यच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. दोघेही वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत. अगस्त्यला गावाला देशाच्या नकाशावर कसे आणायचे हे ठाऊक आहे.

या चित्रपटातील एलिअन्स तुम्ही पाहिले तर ते भाज्यांपासून तयार झालेले वाटतील. ते मुळात एलिअन्स वाटतच नाही. हा चित्रपट सायन्स फिक्शन चित्रपट वाटतच नाही. मग हा चित्रपट कोणत्या धाटणीचा आहे? याचे उत्तर केवळ एकच व्यक्ती देऊ शकते आणि ती म्हणजे या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि एडिटर असलेला शिरीष कुंदर. त्याच्या मागील चित्रपटांशी तुलना केल्यास (जानेमन, तीस मार खान) या चित्रपटात निदान एक कल्पना तरी आहे. किशोर कुमारचे प्रसिद्ध गाणे पाच रुपया बारा आना (चलती का नाम गाडी) बॅकग्राऊंडमध्ये वाजत राहते. अमेरिकन सैनिक गावात मशीनगन्स, टँक्स घेऊन प्रवेश करतात. शेवटी या चित्रपटात नेमके काय बघितले हा विचार करतच प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडतात.

Leave a Comment