योगेश्वर आणि विजय यांना खेलरत्न तर युवीला अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली: क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा खेलरत्न पुरस्कार यावर्षी ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त आणि नेमबाज विजय नारंग यांना प्रदान करण्यात आला. कर्करोगावर मात करून पुन्हा मैदानात उतरलेला झुंजार फलंदाज युवराज सिंग याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मानाचे क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात आले.

क्रीडा प्रशिक्षक आणि संघटक यांनाही द्रोणाचार्य पुरस्कार, साहसी खेळांसाठी तेनजिंग नोर्गे या पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले.

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जगराजसिंह मान यांना देण्यात आला.

Leave a Comment