निवृतीच्या वाटेवर रितिक रोशन

गेल्या काही दिवसापासून कृष-२ या सिनेमाच्या शूट मध्ये व्यस्त असलेला रितिक रोशन हा सध्या निवृतीच्या वाटेवर असल्याचे समजते. त्याच्या निवृत्ती पत्करण्याचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही. त्यामुळेच रितीकाने गेल्या काही दिवसापासून नवीन सिनेमा स्वीकारणे बंद केले असल्याचे समजते. त्याचा बहुचर्चित कृष-२ हा सिनेमा जानेवारी २०१३ मध्ये रिलीज होणार आहे.

त्याने जोया अख्तरच्या जिंदगी मिलेगी ना दोबारा या सिनेमानंतर त्यांनी बाहेरील कोणत्याच दिग्दर्शकाचा सिनेमा स्वीकारलेला नाही. काही दिवसापासून त्याच्या होम प्रोडक्शनचा कृष-२ सिनेमाचे काम मात्र वेगाने सुरु आहे. काही दिवसापूर्वीच रितिक हा करण जोहर दिग्दर्शन करीत असलेल्या करीना कपूर व कबीर खान सोबतच्या सिनेमा साइन करतो आहे असे समजले होते. ती केवळ चर्चा होती प्रत्यक्षात तसा कुठलाच नवीन सिनेमा त्याने साइन केला नसल्याचे समजते.

याबाबत अधिक बोलताना रितिक रोशन म्हणाला, ‘ पुढे चालून काय करयचे आहे ते मी अध्याप ठरवलेले नाही. त्यामुळे मला पहिल्यांदा तसे डीसाइड करावयाचे आहे. सध्या मी एक चांगल्या कथेचा शोधात आहे जे कथानक मला इन्स्पायर करेल त्या मध्येच मी आगामी काळात काम करणार आहे.’