नील आर्मस्ट्राँग यांच्या स्वाक्षरीचा लिलाव

लॉस एंजलीस: चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग यांच्या स्वाक्षरीचा लिलाव लवकरच होणार असून या लिलावाद्वारे मोठी रक्कम जमा होण्याची आशा आयोजकांना आहे.

नील आर्मस्ट्राँग यांचे मागील आठवड्यातच निधन झाले. त्यानंतर यांच्या स्वाक्षरीबाबत रसिकांमध्ये मोठी उत्कंठा असून या लिलावाला मोठा प्रतिसाद लाभेल; असा विश्वास नेट डी सेन्डर्स ऑक्शन या लिलावगृहाचे संचालक नेट सेन्डर्स यांनी व्यक्त केला.

अपोलो मिशन- ११ ची चांद्रमोहीम यशस्वी करून आल्यानंतर आर्मस्ट्राँग यांच्या सह्या घेण्यासाठी झुंबड उडत असे. मात्र अनेक जण आपल्या स्वाक्षरी घेऊन विकत असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यामुळे काही काळानंतर त्यांनी स्वाक्षरी देणे थांबविलेच होते. त्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीला मोठा प्रतिसाद मिळेल; असेही सेन्डर्स म्हणाले.

Leave a Comment