इंडस्ट्रीजमधील कलाकार मंडळी पब्लिसिटी मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा काहीच नेम नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहन्यसाठी वाटेल ते नाटक करायला ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. काही दिवसापुर्वीच बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या राइमा सेनने ट्विटरवर काही फोटो टाकले. हे फोटो तिचा मित्र वरूण थापर सोबत लग्न केल्याचे असल्याचे तिने ट्वीट केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी सर्वस्तरातून वाईट प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यानंतर मात्र लग्न केले नसल्याचे स्पष्ट केले.
त्याचे झाले असे की, राइमा सेन व तिच्या मित्र कंपनीने कलकत्ता येथे सोमवारी रात्री एक पार्टी आयोजीत केली होती. ही पार्टी एन्जॉय करीत असताना तिचा अचानक मुड फिरला. तिने तिचा बॉय फ्रेंड असलेल्या वरूण थापर सोबत काही अंगठी घालत असतनाचे फोटो काढले. हे फोटो तिने लगेचच ट्विटरवर टाकले. हे फोटो लग्नाचे असल्याचे तिने ट्वीट केले. यामुळे सर्वत्र खळबळ माजली.
दुसऱ्याच दिवशी सकाळीच ही बातमी दोघाच्या ही घरी समजली. सर्वस्तरातून वाईट प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यानंतर मात्र राइमा सेनने मी लग्न केले नसून केवळ तसे नाटक केला असल्याचा खुलासा प्रसिद्धी माध्यामापुढे केला आहे. तिच्या या खुलाशामुळे मात्र नागरिकाची दोन दिवस चांगलीच करमणूक झाली.