हशीम आमलाचा वनडेमध्ये विक्रम

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हशीम अमलाने एकदिवसीय सामन्याच्या कारकीर्दीत कमी सामन्यात तीन हजार धावा करण्याचे नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने हा विक्रम प्रस्थापित करीत असताना यापूर्वी ६९ सामन्यात ३ हजार धावा पूर्ण करणाऱ्या विंडीजच्या विव रिचर्डसला आता मागे टाकले आहे.

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रीकेच्या हशीम अमलाने १५० धावा करीत वनडे मधील त्याचे दहावे शतक पूर्ण केले. ही धावसंख्या त्याच्या कारकिर्दीतली सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशाविरूद्ध खेळताना त्याने १४० ही सर्वोच्च धावसंख्या उभारली होती.

यापूर्वी कमी सामन्यात तीन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम वेस्ट विंडीजच्या विव रिचर्डसच्या नवे होता त्याने ६९ सामन्यात ३ हजार धावा केल्या होत्या. अमलाने केवळ ५७ सामन्यात तीन हजार धावचा टप्पा पार करताना त्याचा विक्रम मोडला आहे. रिचर्डसन नंतर दक्षिण आफ्रिकेचे सध्याचे कोच गैरी कर्स्टनचा नंबर लागतो. तर भारताच्या विराट कोहलीने ७५ सामन्यात तर इंग्लंडचा सलामीवीर ग्रहाम गुचने ७६ तर इंग्लंडच्या केविन पीटरसनने ७८ सामन्यात तीन हजार धावाचा टप्पा पूर्ण केला आहे.

Leave a Comment