गंभीरपेक्षा प्रतिभाशाली आहे उन्मुक्त

भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा व सलामीवीर गौतम गंभीर व १९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद्र यांचे कोच असलेल्या संजय भारद्वाज यांच्या मते गंभीरपेक्षा किती तरी पटीने उन्मुक्त चंद्र हा प्रतिभाशाली फलंदाज असल्याचे मत त्यांनी एका मुलाखती वेळी व्यक्त केले.

याबाबत बोलताना संजय भारद्वाज म्हणाले, ‘गौतम ज्यावेळी उन्मुक्तच्या वयाचा होता. त्यावेळी त्याची फलंदाजी एवढी प्रगल्भ नव्हती. एकंदरीत उन्मुक्ताच्या करियर ग्राफकडे पहिले तर त्यांनी कित्येक वेळा फलंदाजी करताना मिळालेल्या संधीचा फायदा घेतला आहे. तर कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात गौतमला संघात स्थान मिळवण्यासाठी फार काळ संघर्ष करावा लागला होता. मी देवाचे आभार मानेन की मला त्यांनी गौतम आणि उन्मुक्त या दोघांचा गाईड केले. मी दोघांना ही केवळ मार्ग दाखवला आहे. दोघेही स्वताच्या कामगिरीच्या जोरावर संघात स्थान टिकवून आहेत. त्या दोघाकडून मला आगामी काळातही यापेक्षा चांगल्या खेळीच्या अपेक्षा आहेत.’

उन्मुक्तला सिनीयर टीममध्ये केंव्हा संधी मिळेल याबाबत संजय भारद्वाज म्हणाले, ‘ उन्मुकतचा सध्याचा परफॉर्मन्स पहिला तर तो २०१३ सालीच्या सुरुवातीला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.’

Leave a Comment