नवी दिल्ली दि.२८ – आकाशप्रेमी आणि खगोलप्रेमींना यंदाच्या २९ ऑगस्टला ब्लू मून पाहण्याची संधी प्राप्त झाली असून यानंतर पुन्हा ही संधी २०१५ साली मिळू शकणार आहे.

नवी दिल्ली दि.२८ – आकाशप्रेमी आणि खगोलप्रेमींना यंदाच्या २९ ऑगस्टला ब्लू मून पाहण्याची संधी प्राप्त झाली असून यानंतर पुन्हा ही संधी २०१५ साली मिळू शकणार आहे.
एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा आल्या तर दुसर्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लू मून म्हटले जाते. दोन पौर्णिमांच्या मध्ये २९ दिवसांचे अंतर असते मात्र महिन्यात ३० किवा ३१ दिवसच असल्याने क्वचित एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात. सरासरी दोन वर्षे आणि सात महिन्यांनंतर अशी संधी येत असते असे खगोलतज्ञ सांगतात. अर्थात हा चंद्र प्रत्यक्षात निळा दिसत नाही, तो नेहमीच्या चंद्रासारखाच असतो मात्र नासाने त्याला ब्लू मून असे नाव दिले असल्याचेही समजते.