नील आर्मस्टाँगच्या स्टेट फ्यूनरल साठी ओबामांवर दबाव

वॉशिग्टन दि.२८- चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव म्हणून जगाच्या इतिहासात अजरामर असलेल्या नील आर्मस्ट्रोँग यांना स्टेट फ्यूनरलचा मान दिला जावा अशी मागणी  यूएस काँग्रेसचे बील जॉन्सन यांनी केली असून त्यामुळे अध्यक्ष बराक ओबामा अडचणीत सापडले असल्याचे वृत्त आहे. नील यांचा वयाच्या ८२ व्या वर्षी शनिवारी मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आजी माजी अध्यक्ष आणि कांही मोजक्याच लोकांना स्टेट फ्यूनरल देण्याची पद्धत आहे. जागतिक युद्धात वीरगती मिळालेल्या अनाम सैनिकांना आणि जनरल मॅकऑथर यांना हा मान दिला गेला होता. सर्वात शेवटी हा मान मिळाला तो माजी अध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांना. ३० डिसेंबर २००६ ते २ जानेवारी २००७ या काळात त्यांचे फ्यूनरल कार्यक्रम पार पाडले गेले होते.

नील आर्मस्ट्रोँगचे मूळ गांव असलेल्या स्टेट ऑफ ओहियोमधूनच बील जॉन्सन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवडून आले आहेत. अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे स्टेट फ्यूनरल संबंधी मागणी करताना ते म्हणाले की नीलचे चंद्रावर पडलेले पहिले पाऊल छोटे असले तरी मानवजातीसाठी ती जायंट लीपच होती. अमेरिक न कांहीही करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. स्टेट फ्यूनरलमुळे प्रत्येक अमेरिकन नीलला श्रध्दांजली अर्पण करू शकेल. नील यांना वॉशिंग्टन डीसीमध्ये स्टेट फ्यूनरल दिले जावे अशी विनंती आपण ओबामा यांना केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment