अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही दिवसापासून शूटच्या कामात व्यस्त आहे. दिल्ली मध्ये जर सोनम कपूरची भेट घेण्यासाठी जर कोणी आले असेल तर त्यांनी अलर्ट राहण्याची गरज आहे. सोनम पुढील तीन महिण्यासाठी कोलावरी दी फेम धनुष सोबत रांझना सिनेमाच्या शूट मध्ये बीझी आहे. त्यासाठी तीन महिने ती दिल्लीमध्येच राहणार आहे.
या फॅशनेबल हेरोइनने दिल्लीमध्ये राहण्यासाठी पाच बेडरूम असलेले एक अपार्टमेंटच खरेदी केले आहे. सुरुवातीच्या काळात काही दिवस सोनमही तिच्या मावशीच्या घरी राहत होती. तिला नातेवाईका सोबत राहयाला लहानपणा पासूनच आवडत असल्याने त्यांच्याकडे राहताना तिला कसलीच अडचण वाटत नाही. मात्र सोनमला इतरांना त्रास देण्यास आवडत नसल्याने तिने हे नवीन घर खरेदी केले आहे. त्यामुळे शूट करून थकल्यावर आता तिला स्वताच्या घरी जाऊन निवांतपणे आराम करता येणार आहे. आवडीचे जेवण तयार करण्यासाठी तिने मुंबईवरून कुक ही बोलावून घेतला आहे.
कोलावरी डी फेम धनुष सोबत ती रांझना सिनेमातून झळकणार असल्याने सध्या ती खुपच खूष दिसत आहे. सोनमने दिल्लीत कुठल्या भागात घर घेतले आहे हे मात्र समजू शकले नाही.