शाहरुखला हवाय बोल्ड आणि ब्युटीफुल चेहरा

इंडस्ट्रीजमध्ये शाहरुख खानची ओळख किंग खान म्हणून का आहे याचा प्रत्यय नुकताच आला. त्याच्या सोबत काम करणाऱ्या नायिकेची निवड काय सहजासहजी होत नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून फराह खानला ‘हैपी न्यू इयर’ या सिनेमासाठी किंग खानच्या इच्छेनुसार हिरोइन शोधन्यासाठी वेळ लागत आहे. शाहरुखला या सिनेमासाठी फ्रेश असलेला बोल्ड आणि ब्युटीफुल चेहरा हवा आहे. त्यासोबतच तिला चांगला डान्स करता येणे गरजेचे आहे.

या बाबत बोलताना फराह म्हणाली, ‘ या सिनेमासाठी मला फ्रेश चेहरा हवा आहे. त्यासोबत तिला स्टेजवर चांगल्या पद्धतिने डान्स परफॉर्मन्स करता येणे आवश्यक आहे. डान्ससोबतच ती दिसण्यास निडर आणि बोल्ड हवी आहे.’

या सिनेमासाठी हिरोइनची चॉइस कोणाची आहे या प्रश्नाचे उत्तर मात्र फराहने देण्याचे टाळले. या सिनेमामध्ये ‘शीला की जवानी’ सारखा डान्स पुन्हा एकदा पाहण्यास मिळणार आहे. या बहुचर्चित सिनेमाचे शुटींग डिसेंबर पासून सुरु होणार आहे.

Leave a Comment