एकमेकापेक्षा वेगळे आहेत खान – कैटरीना

सलमान सोबत स्क्रीन शेयर करणारी कैटरीना कैफ पहिल्यांदाच शाहरुख व अमीर खान सोबत काम करीत आहे. तिच्या मते या तीनही खानच्या स्वभाव पूर्णपणे वेगवेगळे आहेत. त्यांचा परस्परांशी कुठलाच संबध नाही. तिघेही पूर्णपणे वेगळे आहेत.

चार वर्षापूर्वी ‘युवराज’ या सिनेमामधून कैटरीनाने सलमानसोबत बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. नुकताच तिचा सलमान सोबतचा ‘एक था टायगर’ हा सिनेमा चांगलाच हिट ठरला आहे. याबाबत बोलताना कैटरीना म्हणाली, ‘ बऱ्याच दिवसानंतर सलमान खान सोबत स्क्रीन शेयर करणे हा एक चांगला अनुभव होता. सलमानमध्ये कुठ्लाच बदल झाला नसून तो पूर्वीसारखाच प्रोफेशनाली वाटला. शाहरुख खान सोबत पहिल्यांदा काम करताना तो खुपच चार्मिंग वाटला. शूटच्या दरम्यान तो रोलमध्ये पूर्णपणे इन्वोल्व होतो. त्याचा स्वभाव मला खुपच इंटरेस्टिंग वाटला.

आगामी काळात कैटरीना ‘धूम ३’ या सिनेमामध्ये अमीर खानसोबत काम करणार आहे. मात्र अमीर सोबत काम करण्यापूर्वी ती थोडीसी नर्वस वाटली. ती म्हणाली, ‘ अमीर सोबत मी जादा काम केले नसल्याने मी त्याच्याबाबतीत जास्त काही सांगू शकत नाही. मात्र एवढे नक्की की हे तीनही खान एक दुसऱ्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.’

Leave a Comment