पी-३ विग वे शिबिरासाठी शीतल महाजनची निवड

पुणे: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंपिंगचा जागतिक विक्रम करणार्‍या पद्मश्री शीतल महाजन हिची अमेरिकेतील पी ३ विग वे पॅराजंपिंग कँपसाठी निवड झाली आहे. पॅराजंपिंगच्या क्षेत्रात सन्मानाच्या समजल्या जाणार्‍या या शिबिरासाठी निवड झालेली शीतल ही भारतातील पहिली आणि आशियातील दुसरी पॅराजंपर आहे.

कॅलिफोर्नियातील पेरीस परफॉर्मन्स प्लस या प्रतिष्टीत संस्थेने या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सहभागी झालेले २०० पॅराजंपर एकाच वेळी सात विमानातून खाली उड्या मारतात आणि ११ हजार फूट उंचीवर एकत्र येऊन थरारक प्रात्याक्षिके सादर करतात. या शिबिरात एकून १८ जंप होणार असून त्यापैकी सर्वाधिक १८ हजार फूट उंचीवरून पॅराजंपर्स ऑक्सिजन मास्क लाऊन उडी मारतील.

या शिबिरात जगातील सर्वोत्कृष्ट पॅराजंपर्स सहभागी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Comment