नवी दिल्ली: केंद्र शासनाने वॉल्ट डिस्ने या विख्यात कंपनीला भारतात १ हजार कोटीची गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली: केंद्र शासनाने वॉल्ट डिस्ने या विख्यात कंपनीला भारतात १ हजार कोटीची गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.
व्यवसायवृद्धीच्या दृष्टिकोनातून विदेशी कंपन्यात गुंतवणूक करण्याच्या कंपनीच्या धोरणानुसार भारतातील प्रसारण व्यवसायात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव कंपनीने दिला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्याची शिफारस फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाने केंद्र शासनाकडे जुलै महिन्यात केली होती. गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
वॉल्ट डिस्नेसह विदेशी गुंतवणुकीच्या आणखी ९ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून हे प्रस्ताव एकूण १ हजार २५९ कोटी ९२ लाख रुपयांचे आहेत.