विश्व हिंदू परिषदेवर केंद्राचा ठपका

नवी दिल्ली: संघपरिवारातील काही व्यक्ती आणि संस्था सोशल मिडीयाचा गैरवापर करून अफवा पसरविण्याचा आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून केंद्र शासनाने अशी वेबसाएएट, अकाऊन्ट्स आणि ब्लॉग बंद करण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणी वेबसाईट्स सहकार्य करणार नसतील तर त्यांच्यावर भारतात बंदी घालण्याचा इशाराही केंद्राने दिला आहे.

संघाचे मुखपत्र असलेले पांचजन्य, विश्व हिंदू परिषद आणि विश्व हिंदू परिषदेचे आक्रमक नेते प्रवीण तोगडीया यांची ट्विटर अकाऊण्ट्स तातडीने बंद करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.

अफवा आणि द्वेषभावना निर्माण करणार्‍या ३०० वेबसाईट्स आणि वेबपेजवर बंदी घालण्यात आल्याचे केंद्राने सांगितले आहे.

Leave a Comment