मायक्रोसॉफ्टचा नवा लोगो

सॅन फ्रान्सिस्को: मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीने तब्बल १३ वर्षानंतर आपल्या लोगोमध्ये बदल केला आहे. या बदला बरोबरच वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आपल्या धोरणात आई उत्पादनातही बदल घडवून आणेल; असा कयास आहे.

ज्या काळात इंटरनेटचा फारसा प्रसार नव्हता आणि मोबाईल फोन ही चैनीची वस्तू होती त्या काळात फेब्रुवारी १९८७ मध्ये विंडोज-२ बाजारपेठेत आणताना आपल्या लोगोमध्ये पहिल्यांदा बदल केला होता.

मागील दशकात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने बदल घडून आले आहेत. कॉम्प्युटर्सच्या ऐवजी आता स्मार्ट फोन आणि तटॅब्लेट्ससारख्या टच स्क्रीन उपकरणांना अधिक मागणी आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सज्ज असून ऑक्टोबरमध्ये बाजारपेठेत दाखल होणारे विंडोज-८ हे या बदलांचे निदर्शक असेल; असा कंपनीचा दावा आहे. विंडोज-८ पारंपारिक संगणकाबरोबरच टच स्क्रीन उपकरणातही उपयुक्त ठरणार आहे.

आय पॅडशी स्पर्धा करण्यासाठी कंपनी विंडोज-८ वर आधारित स्वत:चे टॅब्लेटही बाजारपेठेत आणणार आहे.