’लोकसभा निवडणुकीत राहुल गांधीविरुद्ध नरेंद्र मोदी‘

नवी दिल्ली,२१ ऑगस्ट-२०१४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात खरी लढत होणार आहे, असे वक्तव्य केंद्रीय पोलाद मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांनी आज (सोमवार) केले.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या पंतप्रधान होण्याच्या इच्छेचा समाचार घेत बेनी प्रसाद वर्मा म्हणाले, की आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान काँग्रेस पक्षाचा असेल किंवा नरेंद्र मोदी असतील. परंतु, मुलायमसिंह नक्कीच पंतप्रधान होणार नाहीत. २०१४ च्या निवडणुकीत राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात थेट लढत असेल.

दरम्यान, केंद्रीय मंत्री हरीश रावत यांनी बेनी प्रसाद वर्मा यांनी केलेले वत्त*व्य खोडून काढत राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.