नवी दिल्ली, २१ ऑगस्ट-देशात निर्माण होणार्या अफवांवर बंदी घालण्यासाठी गृहमंत्रालयाने २५० वेबसाईटसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या वेबसाईटवर काही भडकावू फोटो आणि व्हिडिओ अपलोड़ करण्यात आले होते. त्यामुळे देशाच्या विविध भागात वास्तव्य करणार्या आसामी लोकांनी आसामचा रस्ता धरला.
गृहमंत्रालयाने आतापर्यंत १३० वेबसाईटसरवर बंदी घातली असून, उत्तेजक विषय मांडणार्या आणखीनही काही वेबसाईटसवर बंदी घालण्याची शक्यता आहे. या मोहिमेमध्ये सीईआरटीचीही (कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम) मदत घेण्यात येणार आहे.
अफवा पसरवण्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यासाठी फेसबूक, टिवटर, यु ट्यूब या सोशल साईटसचा वापर करण्यात आला होता. सोशल साईटसवर १३ जूलैपासून अफवांचे पेव फुटले होते. साईटसवर मुस्लिमविरोधी फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते. या भडकावू फोटो आणि व्हिडिओमुळे मुंबई,पुणे, चेन्नई या भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्थलांतर केले.