आशिया असेल जगातील श्रीमंताचे निवासस्थान

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट-सिंगापूर, हाँगकाँग, तायवान आणि भारतासह अनेक आशियातील देशांमध्ये येणार्‍या काळात चांगली आर्थिक परिस्थिती निर्माण होणार आहे. परिणामी आशियामध्ये श्रीमंत लोकांची संख्या वाढणार आहे.

याचाच अर्थ युरोप, अमेरिकेच्या तुलनेत आशियामध्ये श्रीमंत लोक राहाणार्‍यांची संख्या वाढणार आहे. यात सिंगापूरचा क्रमांक वरचा असणार आहे.
सर्वाधिक श्रीमंताचे निवसस्थान असणार्‍या शहरात दुसरा क्रमांक लागेल तो हाँगकाँगचा. तर तायवान आणि दक्षिण कोरिया क्रमशाः तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर राहाणार आहेत.

हे चारही शहर आशियामध्ये आहेत. नाईट फ्रँक अँड सिटी प्रायव्हेट वेल्थच्या ’२०१२ वेल्थ रिपोर्ट’ मध्ये ही सर्व माहिती देण्यात आली आहे.
या अहवालात म्हटले आहे की, २०५० मध्ये जगाचे स्वरुपच बदलले असेल. तेव्हा जगात कुठेच नसेल एवढे दर डोई उत्पन्न हे सिंगापूरमध्ये असणार आहे. भविष्यात सिंगापूरमध्ये दर डोई उत्पन्न १,३७,७१० डॉलर एवढे असणार आहे.

Leave a Comment