राज आणि उद्धव यांचे सुरात सूर

मुंबई: गृहमंत्री आर. आर. पाटील आणि पोलीस आयुक्त अरूप पटनायक हे दोघेही पोलिसांचे, जनतेचे संरक्षण करण्यात आणि दंगेखोरांना गजाआड करण्यात अपयशी ठरले असून या दोघांचाही राजीनामा घ्यायला हवा; असे सांगत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरात सूर मिसळले आहेत.

रझा अकादमीच्या मोर्चादरम्यान आझाद मैदानावर उसळलेल्या हिंसाचारात नुकसान झालेल्या अमर जवान ज्योती या क्रांती स्तंभाची महापालिका आणि शिवसेनेच्या वतीने दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर ठाकरे यांनी क्रांती स्तंभाला अभिवादन केले.

शिवसेनेच्या दृष्टीने हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असून ही भूमिका मान्य असणार्‍या कोणाबरोबरही जाण्यास शिवसेना तयार आहे; असे यावेळी सांगून ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मोर्चाला पाठींबा दिल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment