मोबाईल फेकण्याचा विश्वविक्रम

हेलसिंकी (फिनलंड), २१ ऑगस्ट-काहीतरी वेगळे करुन विश्वविक्रम करण्याचे काही जणांना वेडच असते. असाच नवा विश्वविक्रम एका तरुणाने केला आहे. फिनलंड येथे झालेल्या मोबाईल फेकण्याच्या स्पर्धेत या तरुणाने आपला मोबाईल १०१.४६ मीटर लांब फेकून नवा विश्वविक्रम केला आहे.

इरे कार्जालेनेन (१८) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने फेकलेला मोबाईल हा बहुदा त्याचाच असण्याची शक्यता, फिनलंडची सरकारी दूरचित्रवाणी वाहिनी ’वायईएलई’ने वर्तविली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या जेरेमी गॅलप याला याने मोबाईल फेकण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जेरेमीने ९४.६७ मीटर लांब मोबाईल फेकला.
मोबाईलचा कंटाळा आलेल्या किंवा त्याच्या वापरामुळे निराश, हताश झालेल्या लोकांना मोकळे होण्यासाठी या स्पर्धेची मदत होत असल्याचा आयोजकांचा दावा आहे.

Leave a Comment