
पुणे, दि.२१- राज्य शासनाने शेतकर्यांसाठी विमा योजना २००९-१० साला पासून सुरू केली होती. यावर्षी शासनाने एक कोटी ३७ लाख शेतकर्यांच्या विम्यासाठी ३१ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचे नाव शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे.

पुणे, दि.२१- राज्य शासनाने शेतकर्यांसाठी विमा योजना २००९-१० साला पासून सुरू केली होती. यावर्षी शासनाने एक कोटी ३७ लाख शेतकर्यांच्या विम्यासाठी ३१ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचे नाव शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे.
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदर्श, विचूदर्श, विजेचा शॉक बसणे अशा नैसगिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात याप्रमाणे अन्य कारणामुळे होणार्या अपघातामुळे शेतकर्यांचा मृत्यू ओढावतो किवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यत्त*ीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
अशा अपघात ग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी कोणतीही स्वतंत्र्य विमा योजना नसल्याने शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी राज्यातून एक कोटी ३७लाख शेतकर्यांनी अर्ज प्राप्त झाले आहे. विमा योजनेसाठी महसूल विभागाकडील सातबारा नोंदी प्रमाणे१० ते ७५ वयाच्या शेतकर्यांच्या नोंदी ठेवण्यात येणार आहे. या योजनेचे सुरक्षा कवच १५ ऑगस्ट २०१२ ते १४ ऑगस्ट २०१२ पर्यंत सुरू राहणार आहे.
योजनेच्या कालावधीच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी चालू वर्षातील ९० दिवसांचा कालावधीतील प्रस्ताव स्विकारणे विमा कंपनीला बंधनकारक राहणार आहे. विशेष केसमध्ये अपघातामध्ये ९० दिवसांनतर प्राप्त होणारे विमा प्रस्ताव कंपनीने घेण बंधनकारक केले आहे. विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर साठ दिवसांमध्ये यावर निर्णय घेणे बंधनकारक आहे.
अपुर्या कागदपत्रंामुळे प्रलबित राहिलेल्या,नाकारलेल्या प्रस्तावांच्या कागदपत्राची पुर्तता करण्याची जवाबदारी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषि अधिकारी सोपवण्यात आली आहे. शेतकरी कृर्षी विम्यासाठी कोकण आणि पुणे विभागातून ४८ लाख ९५हजार, अमरावती, नागपूर आणि नाशिक मधून ५४ लाख ८०हजार, औरंगाबाद विभागातून ३३लाख २५हजार शेतकर्यांची नोंदणी करण्यात आली आहे.