’हिरोईन’मध्ये करीनासाठी तयार केले १३० कॉस्ट्यूम, खर्च एक कोटी ५० लाख रुपये

मुंबई-मधुर भांडारकरच्या ’हिरोईन’या चित्रपटामधील ’हलकट जवानी’ हे गाणे सध्या सगळीकडे धुम करत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या करीना कपूरवर हे गाणे चित्रित करण्यात आले. या चित्रपटात एक नाही तर दोन अँटम साँगमध्ये करीना दिसणार आहे.
’हलकट जवानी’या गाण्यात करीनाने अत्यंत महागडे कॉस्ट्यूम वापरले आहेत. या चित्रपटात करीनासाठी १३० कॉस्ट्यूम तयार केले गेले, ज्यावर एक कोटी ५० लाख रुपये खर्च झाले.
या गाण्यात करीना गुलाबी साडीमध्ये दिसते. या साडीची बोली लावण्यात येणार आहे. त्यातून मिळालेली रक्कम करीना तिच्या सामाजिक संघटनेला देणार आहे. या चित्रपटासाठीचे कॉस्ट्यूम फॅशन डिझायनर आणि तिचा मित्र मनिष मल्होत्राने डिझाईन केले आहेत.
महागड्या कपड्यांचा ट*ेंड तसा काही नवा नाही. याआधीही करीनासह अनेक अभिनेत्रींनी महागड्या कॉस्ट्यूमसह रुपेरी पडद्यावर आपला जलवा दाखवला आहे. शाहरुख – सलमानही त्यात मागे नाही.

Leave a Comment