’फुलराणी’ला मास्टर ब्लास्टरकडून बीएमडब्ल्यू भेट

हैदराबाद, २० ऑगस्ट-ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने ब्राँझ पदक पटकावले. तिच्या या कामगिरीबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने बीएमडब्ल्यू कार भेट देऊन तिचा गौरव केला. येथे एका छोटेखानी कार्यक्रमात सचिनने ही शानदार भेट सायनाला दिली.
तो म्हणाला, अजूनही आम्ही सायनाच्या सर्वोत्तम खेळाची वाट बघत आहोत. यातून सचिनने पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सायनाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा व्यत्त* केली.
तसेच उपस्थित बॅडमिंटनपटूंकडूनही उत्कृष्ट कामगिरी करुन देशाचे नाव उज्ज्वल कराल अशी आशा व्यत्त* केली.
यावेळी सायनानेही पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मिळवून देण्याचा विश्वास व्यत्त* केला.

Leave a Comment