रोमहर्षक लढतीत भारताची पाकिस्तानवर मात

बाबा अपराजित व विजय झोल यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रोमहर्षक लढतीत १९ वर्षाखालील भारतीय संघाने पकिस्तानवर एक गडी राखून विजय मिळविला. भारतीय संघ या विजयामुळे सेमिफायनलमध्ये पोहचला आहे.

सुरुवातीला भारतीय गोलंदाजी समोर पाक संघाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. ५० ओवरच्या सामान्यात पाक संघ ४६ ओवरमध्ये १३७ धावाकाडून ऑल ओउट झाला. भारताकडून संदीप शर्मा व रविकांत सिंहने तीन-तीन गडी बाद केले. या स्पर्धेत आतापर्यंत एक ही सामना न हरणारी पाक ती पाहिल्यादाच कमी धावसंख्या काढून बाद झाली. पाक संघाच्या सात फलंदाजना दोन अक्षरी धाव संख्या गाठता आली नाही. पाककडून बाबर आजमने ५० धावा केल्या तर एहसान आदिलाने त्याला ३५ धावा काढून साथ दिली. पाक संघ केवळ १३६ धावाच करू शकला.

कमी धावाचे आवाहन घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात निराशाजनकच झाली. कर्णधार उन्मुक्त चांद भोपळा न फोडता बाद झाला. त्यानंतर लगेचच सलामीवीर प्रशांत चोप्रा बाद झाला . त्यानंतर आलेला हनुमा हिवरी हा लगेचच बाद झाला त्यामुळे भारताची अवस्था बिकट झाली होती. बाबा अपराजित व विजय झोलने भारताचा डाव सावरला. विजयने ६२ चेंडूत ३६ धावा केल्या. विजय नंतर आकाशदीप लगेचच ७ धावा कडून बाद झाला. मात्र त्यानंतर अपराजीतने दमदार फलंदाजी करत भारतीय संघला विजया समीप नेले. त्याने ५१ धावा केल्या. मात्र १३७ धावाचे आव्हान पार करताना भारताचे ९ गडी बाद झाले होते. संदीप सिंह व हरमीत सिंहने शेवटच्या जोडीसाठी १० धावची भागीदारी करीत विजय मिळविला. या रोमहर्षक लढतीत विजय मिळवल्याने भारताचा संघ सेमिफायनलमध्ये पोहचला आहे. आता गुरुवारी भारताची लढत न्यूझीलंडसोबत होणार आहे.

Leave a Comment