दिल्लीतील फैशन विक साजरा होत असताना सिलेब्रिटीनी हजेरी लावली नाही असे कधीच होत नाही. मात्र यावेळी या विकला हजेरी लावलेल्या कलाकारांना लगीनघाई झाली असल्याची चर्चा त्यांच्या उपस्थितीतच रंगली होती.

दिल्लीतील फैशन विक साजरा होत असताना सिलेब्रिटीनी हजेरी लावली नाही असे कधीच होत नाही. मात्र यावेळी या विकला हजेरी लावलेल्या कलाकारांना लगीनघाई झाली असल्याची चर्चा त्यांच्या उपस्थितीतच रंगली होती.
फैशन डिजाइनर आशिमा-लीनाच्या शो मध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर हिने हजेरी लावली. सध्या तिला सैफ अली खान व करीनाच्या लग्नाची घाई झाली आहे. शर्मिला म्हणाली, ‘ सध्या मी पण तुमच्या सारखीच सैफ आणि करीनाच्या लग्नाची वाट पाहत असून ते दोघेजण कोणती डेट फायनल करतात. त्यानुसार मला पण तयारी करायची आहे.’
दुसरीकडे मनिष मल्होत्रा यांच्या शो मध्ये कैटरीना कैफ देखील सहभागी झाली होती. तिच्या या शो मधील सहभागाने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कैटरीना म्हणाली, ‘ मी लग्न करणार आहे, मात्र त्याची निश्चित वेळ सध्या तरी ठरवलेली नाही. सर्वांप्रमाणेच मी पण लग्नाचे स्वप्न पाहत असते. मात्र आज मनिषने तयार केलेला हा ड्रेस सुमारे १० किलो वजनाचा आहे आणि लग्नात मला नक्कीच या पेक्षा कमी वजनाचा ड्रेस घालायला आवडेल.’