रामलीलाचे शूट पुढील महिन्यापासून

निर्माता संजय लीला भन्साळीचे स्वप्न असलेला ‘रामलीला’ या सिनेमाचे शूट पुढील महिन्यापासून सुरु होणार असल्याची माहिती अभिनेता अभिमन्यू सिंह यांनी दिली. या सिनेमातील इतर कलाकारविषयी मात्र त्यांनी आताच काही सांगण्यास नकार दर्शविला आहे.

याबाबत आधीक माहिती देताना अभिमन्यू सिंह म्हणाला, ‘ रामलीला या सिनेमाचे शुटींग पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. या सिनेमातील कलाकाराची निवड संजय भन्सालीने केलेली आहे. त्या कलाकाराची नावे तेच येत्या काही दिवसात जाहिर करणार आहेत. या सिनेमात माझी भूमिका काय असणार, याची कल्पना मला नाही.’

गुजारिश या सिनेमानंतर संजय लीला भन्साळी दोन वर्षाच्या रेस्टनंतर निर्मिती क्षेत्रात उतरत असून रामलीला सिनेमाची निर्मिती हे त्याचे बऱ्याच दिवसापासूनचे स्वप्न होते ते आता सत्यात उतरणार आहे. हा सिनेमा रोमिओ व जुलीयटच्या प्रेमकहाणीवर आधारित असल्याचे समजते. यापूर्वी जुलीयटची भूमिका करीना कपूर करणार होती मात्र तिने रामलीला सिनेमात काम करण्यास नकार दिला असल्याने तिच्या जागी कोण घेणार याचा शोध सुरु आहे. या रोलसाठी दीपिका पदुकोण प्रयत्नशील आहे. ती गेल्या काही दिवसापासून गुजराती जुलीयट होण्याची तयारी करीत असल्याचे समजते.