बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच जम बसविल्यानंतर वीणा मलिकने राजकारणी मंडळींची मर्जीही संपादन केली असल्याचे दिसत आहे. वीणा पाकिस्तानी अभिनेत्री असून तिच्या बद्दल अनेकांना अनेक शंका कुशंका होत्या. मात्र हे सारे संशय फिटले असावेत. कारण थोडेच दिवसात ती भाजपच्या पोस्टरवर झळकलेली दिसेल.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिम्मित आयोजित एका इवेंटमध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष राज पुरोहित यांनी वीणाला गेस्ट म्हणून बोलविले होते. राधाच्या मेकअपमध्ये विणणे दर्शन दिले आणि अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. वीणा म्हणाली, ‘ मुंबईकर खूप प्रेम करतात हे मी आतापर्यंत ऐकून होते मात्र याचा प्रत्यक्षात अनुभव याठिकाणी आला आहे. मुंबई सिटी माझ्यासठी खूप लकी आहे. माझ्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मुंबई १२५ किलोमीटर’ है असे असून तो लवकरच रिलीज होत आहे.’
यापूर्वी ही अनेक पाकीस्तानी कलाकारांना भारतीयांनी स्वीकारले आहे. आता भारतातील नेतेमंडळी या मध्यामातून भारत-पाक संबध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच आगामी काळात वीणा भाजपच्या पोस्टरवर झळकली तर आश्चर्य वाटायला नको.