फेडरर पुढच्या फेरीत; मरे पराभूत

ओलोपिक स्पर्धेतील विजेता अंडी मरेला सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत पराभव सहन करावा लागला आहे. तर दुसरीकडे रॉजर फेडरर पुढच्या फेरीत दाखल झाला आहे.

फ्रान्सच्या जेरेमी चार्डीच्या झंझावातापुढे मरेचा निभाव लागला नाही. चार्डीने मरेचा ६-४, ६-४ अशा सरळ सेट मध्ये पराभव केला. अमेरिकी ओपन स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वपूर्ण मानली जाते. तर दुसरीकडे चार वेळेस विजेता ठरलेला रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू असलेल्या बर्नोड टोमची हिचा ६-२, ६-४ असा पराभव केला. तर २००९ चा अमेरिकन टेनिस स्पर्धा विजेता जुआन मार्टीन डेल पोट्रोने सर्बियाच्या विक्टरचा ७-६, २-६, ६-१ असा पराभव केला.

आता पुढच्या फेरीत चेकच्या मार्डी फिश व फेडरर यांचा मुकाबला होणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment