विकासदर वाढणार आणि महागाईही!

नवी दिल्ली: सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ६.७ असेल; अशी ग्वाही पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने दिली आहे. मात्र मॉन्सूनच्या अवकृपेमुळे महगाईचा दरही साडेसहा ते ७ असा चढाच राहील अशी जाणीवही समितीने करून दिली आहे.

डॉ. सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक सल्लागार समितीने आपला अहवाल नुकताच पंतप्रधानांना सादर केला. या अहवालात देश या आर्थिक वर्षात ६.७ विकास दर गाठू शकेल; असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र महागाई कायम रहाणार असून मॉन्सूनच्या पावसाने अवकृपा केल्यामुळे कृषी उत्पादनात घट होऊन त्याचा वृद्धी दर २.८ टक्क्यावरून अर्ध्या टक्क्यापर्यंत खाली येईल; अशी जाणीवही अहवालात करून देण्यात आली आहे.

आर्थिक विकासाचे चक्र गतिमान करण्यासाठी रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मुभा देण्याची आवश्यकता या अहवालात प्रतिपादन करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिझेलची दरवाढ, सोन्याच्या आयातीवर निर्बंध, म्युचुअल फंड्स आणि विमा गुंतवणुकीला प्रोत्साहन अशा काही उपाययोजनाही समितीने सुचविल्या आहेत.

Leave a Comment