नवी दिल्ली: माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. एअर इंडियाच्या आर्थिक दुरवस्थेला पटेल हेच जबाबदार असून त्यांची संसदीय दक्षता समितीमार्फत चौकशी करावी; अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री पटेल यांनी एअर इंडिया कंपनीला आर्थिक हानी पोहोचविणारे अनेक निर्णय घेतले आणि ते अमलात आणण्यास आपल्याला आणि कंपनीच्या संचालक मंडळाला भाग पडले असा आरोप कंपनीचे तत्कालीन प्रमुख संजीव अरोरा यांनी केल्याची बाब उघड झाली आहे. अरोरा यांनी याबाबत पटेल यांची लेखी तक्रार तत्कालीन कॅबिनेट सचिव बी. के. चतुर्वेदी यांच्याकडे सन २००५ मधेच केली होती. ही लेखी तक्रार आता उघडकीला आली आहे.
या तक्रारीवरून पटेल यांची संसदीय दक्षता समितीने चौकशी करावी अशी मागणी कम्युनिस्ट खासदार प्रबोध पांडा आणि निशिकांत दुबे यांनी केली आहे.