सरबजितवर होतोय विषप्रयोग

इस्लामाबाद दि.१६- भारतीय हेर असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरूंगात फाशीची शिक्षा भोगत असलेल्या सरबजितने त्याच्यावर विषप्रयोग केला जात असल्याचे पत्र वकील ओवेश शेख यांच्यामार्फत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्याच्या नातलगांकडे पाठविले आहे. वकील शेख यांच्या म्हणण्याप्रमाणेही सरबजितच्या आरोपात तथ्य आहे. सरबजित गेली वीस वर्षे तुरूंगात खितपत पडला आहे.

सरबजित ज्या तुरूंगात सध्या आहे तेथील जेल सुपरिटेंडेंट बदलेले आहेत आणि तथे मोहसीन राफीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरबजितच्या पत्रानुसार राफीक आल्यापासूनच त्याला देण्यात येणार्‍या खाद्यपदार्थात बदल झाला आहे. हे पदार्थ अगदी थोड्या वेळात खराब होतात आणि ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. या अन्नपदार्थातून त्याला विष घातले जातेय असे त्योच म्हणणे आहे. हे पदार्थ खाल्यापासून त्याची तब्येत बिघडत चालली आहे मात्र त्याला वैद्यकीय उपचारांसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच खाद्यपदार्थांबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही असेही त्याचे म्हणणे आहे.