ह्युस्टन: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अंतरिक्षात तिरंगा फडकाविला. आपण भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

विल्यम्स या रशियाचे युरी मालेन्चेकोव्ह आणि जपानचे अकीहीको होशिंदे यांच्यासह संशोधन प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात रवाना झाल्या आहेत.
आपले पिता गुजराती असल्याने आपण अर्ध्या भारतीय आहोत आणि भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान असून आपण अत्यंत उत्साहाने भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करीत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.