विलासरावांना बॉलीवूडची श्रद्धांजली

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाबद्दल बॉलीवूडने श्रद्धांजली वाहिली आहे.विलासरावांना राजकारणाप्रमाणेच कलाक्षेत्रात ही रस होता आणि त्यांचे अनेक कलाकारांशी चांगले संबंधही होते. विलासरावांचा मुलगा रितेश आणि सून जेनेलिया कलाकार आहेत.

विलासरावांच्या मृत्यूविषयी ट्विटरवर शाहरुखखान म्हणतो, रितेश माझा मित्र आहे. विलासराव वंडरफुल जंटलमन होते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. अक्षयकुमारने मुंबईचे शांघाय करण्याचे स्वप्न पाहणारा नेता गेला असे सांगून रितेश आणि कुटुंबियांच्या दुखात सह्भागी असल्याचे ट्विट केले आहे. माधुरी दिक्षित् ने विलासराव यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

याचबरोबर करन जोहर,दिया मिर्झा, आयेशा टाकिया, राज कुंद्रा,रवीना टंडन यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Comment