ऑलिम्पिकच्या रिंगच्या खाली लग्नाची रिंग

लंडन, दि.१२ – ऑलिम्पिकला जायला मिळणे हे प्रत्येक क्रीडा शौकिंनासाठी पर्वणी असते. मात्र या जोडप्यांसाठी हे ऑलिम्पिक त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी संस्मरणीय घटनेपैकी एक ठरली.

३१ वर्षीय ब्रेम लोबिक आणि ३० वर्षीय हेटी पेनेनने ऑलिम्पिक पार्कमध्येच आपला साखरपुडा आटोपून टाकला. 

ब्रेम म्हणाला, ’हेटीला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी मी जागेचा शोध घेत होतो. त्याचवेळी मला ऑलिम्पिकच्या पाच रिंग्ज दिसल्या. त्याचवेळी मी तिला याच रिंग्ज देण्याचा निर्णय घेतला. मात्र हे काम सोपे नव्हते. तिथे रिंगच्या समोर फोटो काढण्यासाठी मोठी रांग लागली होती.’ शेवटी ते दोघे कसेतरी पुढे आले. तिथे ब्रेमने लग्नासाठी हेटीला प्रपोज केले. तिनेही होकर देण्यास वेळ लावला नाही. 

Leave a Comment