जेट एअर – एचडीएफसी चे संयुक्त क्रेडीट कार्ड

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी जेट आणि खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची एचडीएफसी बँक यांनी ग्राहकांना अनेक फायदे आणि सवलती देणारे को ब्रांडेड क्रेडीट कार्ड उपलब्ध केले आहे. गेली १२ वर्षे जेट ची अश्या कार्डसाठी परदेशी सिटी बँकेबरोबर असलेली युती मे मध्ये संपल्यानंतर हा नवा करार करण्यात आला आहे. एचडीएफसी कार्ड व्यवहारात गेली १० वर्षे असली तरी अश्या प्रकारचा टाय अप प्रथमच करत आहे. या नव्या कार्डमुळे दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांशी असलेले हितसंबंध अधिक दृढ करू शकणार आहेत.

जेटचे चीफ एक्सिक्युटीव निकोस कार्डसिस कार्ड लोंच समारंभात म्हणाले की ही कार्ड द वर्ल्ड, प्लाटीनम, आणि टीटानियम अश्या तीन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत आणि जेट प्रीव्हिलेज सदस्यांसाठी ती पर्वणी ठरतील. जेट प्रिव्हीलेजचे देशात २८ लाख सदस्य आहेत.

क्रेडिटकार्ड मार्केटमध्ये एचडीएफसी लीडर असून एकूण ग्राहकात त्यांचा वाटा १/३ इतका आहे. एचडीएफसीचे ५७ लाख कार्ड होल्डर आहेत. बराच विचार करून जेट बरोबर कार्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे असे बँकेचे  कार्यकारी संचालक परेश सुखटणकर यांनी सांगितले. ते म्हणाले अन्य कंपन्यांबरोबर ही असा टाय अप करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. बँक दर महिन्याला सरासरी ९० हजार क्रेडीट कार्ड इश्यू करत असते असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment