साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांची ओळख पटली

पुणे: जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोघा संशयिताची ओळख पटली असून प्रत्यक्षदर्शिनी त्यांची ओळख पटविली आहे.

शहरातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर १ ओगस्ट रोजी ४ बॉम्बस्फोट झाले तर २ बॉम्ब निकामी करण्यात आले.

हे बॉम्ब डॉ. शहनवाज आणि साजिद या दोघांनी घटनास्थळी सायकलमध्ये ठेवल्याचे सीसी टीव्ही चित्रणावरून उघड झाले. हे दोघे इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी आहेत.
काही प्रत्यक्षदर्शिनी साजिद याला सायकल विकत घेताना पहिले होते; तर सायकलवरून आलेल्या डॉ. शाहनवाज याची पार्किंगमधून दुचाकी काढत असलेल्या युवकाशी बाचाबाची झाली होती. या दुचाकीस्वाराला या दोघांचे छायाचित्र दाखविले असता त्याने डॉ. शाहनवाजला ओळखले.

Leave a Comment