ऑलिम्पिकसाठी भारताने ’मिशन टवेंटी-२०’ आखले – अजय माकन

नवी दिल्ली, दि.११ – एका वर्षात ऑलिम्पिक विजेते तयार होत नाहीत, त्यासाठी अनेक वर्षाची कठोर मेहनत लागते हे सत्य भारताला कळले असून, २०२० च्या ऑलिम्पिकसाठी भारताने ’मिशन टवेंटी-२०’ आखले आहे.

२०२० मध्ये ऑलिम्पिकमध्ये जाणारी टीम इंडिया २५ पदके आणेल, असे लक्ष ठेवण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी सांगितले की, भारताने २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी गुणी खेळाडू हेरण्यापासून त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. या खेळाडूंना सर्व सुविधा पुरवण्यासाठी क्रीडा मंत्रालय काम करेल. भारतीय खेळाडू गेल्या काही वर्षात ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

 माकन यांचे हे ’मिशन टवेंटी-२०’ किती सफल ठरले ते येणारा काळच सांगेल. 

 

Leave a Comment