सलमान नाही अजय होणार बाजीराव

संजय लीला भन्साळी बऱ्याच दिवसापासून बाजीराव पेशवे व त्यांची पत्नी मस्तानी यांच्या जीवनावर आधरित ‘बाजीराव-मस्तानी’ या सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार करीत आहे. हा सिनेमा भन्साळीचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने मिडियामध्ये सुद्धा गेल्या दहा वर्षापासून याच सिनेमाची चर्चा सुरु असते.

भन्साळीने १९९९ मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाच्या निर्मितीनंतर ‘बाजीराव-मस्तानी’च्या प्रोजेक्टवर काम सुरु करण्याचा विचार करीत होता. त्यासाठी भन्साळीने त्याचा फेवरीट हिरो सलमान खान व करीना कपूरची निवड ही केली होती. जुहू मधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सलमान-करीनाचा फोटो शूट ही केले होते. मात्र ते त्याचे स्वपन त्यावेळी साकार झाले नाही. काही कारणामुळे हा त्याचा प्रोजेक्ट रखडला.

भन्साळीने पुन्हा या बहुचर्चित ‘बाजीराव-मस्तानी’वर काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यावेळी सलमानने या सिनेमामध्ये करीनाऐवजी कैतरीना कैफला घेण्याची अट ठेवली असल्याने हा सिनेमा रखडला होता. आता पुन्हा नव्याने या सिनेमाचे काम सुरु करण्याचा विचार तो करीत असून बाजीरावचा रोल आता अजय देवगण करणार आहे. यापूर्वी हा रोल शाहरुख खान व बिग बी अमिताभ बच्चन करणार अशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे आता या सिनेमाचे शूट सुरु झाल्यानंतरच बाजीराव व मस्तानीचा रोल कोण करणार हे समजेल.

Leave a Comment