शाहिदने बदलला निर्णय

गेल्या काही दिवसापासून शाहीद कपूरचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरू शकला नाही. त्यामुळे चिंतीत असलेल्या शाहिदला काही दिवसापूर्वी घेतलेला निर्णय बदलावा लागला आहे. त्याने यापूर्वी एका वर्षात एकाच सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता शाहिदला तो निर्णय बदलून, येत्या काळात त्याच्याकडे कुठले प्रोजेक्ट येथील त्याचा स्वीकार तो करणार आहे.

एवडेच नव्हे तर आगमी काळात प्रोजेक्टची निवड करताना त्याच्या बाबतीत जास्त विचार न करण्याचे हे त्यांनी ठरविले आहे. शाहीद म्हणाला, ‘ सिनेमा चालला किंवा नाही चालला याचा विचार मी फारसा करत नाही. जे काम मला मनापासून आवडते ते काम मी येत्या काळात जरूर करणार. तसे पहिले तर एकदा सिनेमा हिट होणार की फ्लॉप हे सुरुवातीला कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे फक्त विश्वास कायम ठेवण्याची गरज आहे. आपल्याला कम्फर्टेबल असलेले काम निवडल्यानंतर स्वताच्या टँलेटच्या जोरावर आपण हव ते यश मिळवू शकतो.’

Leave a Comment